अध्यात्मसार

अध्यात्मसार​

अध्यात्मसार -

अध्यात्म हाच खऱ्या आनंदाचा आणि वास्तविक सत्याचा पाया आहे.

मनुष्य देहच मोक्षाचे द्वार आहे. त्यामुळे भौतिक संपत्ती पेक्षा अध्यात्मिक संपत्ती जास्त महत्वाची आहे कारण आध्यात्मिक संपत्ती मुळेच आपल्या आत्म्याचा विकास होऊन आपल्या आत्म्याचे परमात्म्यासोबत मिलन होणार आहे आणि या मिलनामुळे मायेची शक्ती आपलं काहीच बिघडू शकणार नाही आणि या मिलनामुळे योगमाया शक्ती मिळून आपण परमेश्वरासारखे परम शुद्ध होऊ आणि अखेरीस आपली या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊन आपल्याला भगवंताच्या परम धामात म्हणजेच वैकुंठात प्रवेश मिळेल.

त्यामुळेच हि आध्यात्मिक संपत्ती मिळवणं आपल्या या मनुष्य देहाचं कर्तव्यच आहे. या अध्यात्मसार चॅनेल च्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत सर्व अध्यात्मिक माहिती फ्री मध्ये पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत ज्याने आपल्या सर्वांनाच या मनुष्य देहाद्वारे आपलं अंतःकरण शुद्ध करून आपल्या आत्म्याचं  कल्याण करता येईल.